बारामती बाजार समिती मध्ये ज्वारीला प्रति क्विंटल रू.७५७५ असा उच्चांकी दर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

बारामती बाजार समिती मध्ये ज्वारीला प्रति क्विंटल रू.७५७५ असा उच्चांकी दर..

बारामती बाजार समिती मध्ये ज्वारीला प्रति क्विंटल रू.७५७५ असा उच्चांकी दर.. 
बारामती(रामायण धर्माधिकारी):- बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात आज गुरूवार दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या लिलावात मिलिंद अशोक सालपे यांचे आडतीवर शेतकरी  अमित खराडे यांचे ज्वारीला  प्रति क्विंटल रू.७५७५ असा उच्चांकी दर मिळाला तर बाजार आवारात सरासरी ज्वारीचे दर रू. ५७००/- पर्यन्त निघाले. दुष्काळी परिस्थीती व सध्या पेरणीचा सिझन असल्याने आवक कमी झाल्याने तसेच स्थानिक व बाहेरील पेठेतील मागणी वाढल्याने चांगल्या दर्जेच्या ज्वारीला विशेषत: मालदांडी वाणाला चांगली मागणी व उच्च दर मिळत आहे असे सभापती विनायक गावडे व उपसभापती अरूण सकट यांनी सांगितले.  
शेतमालाचे लिलावापुर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचुक वजन या समितीच्या धोरणामुळे आणि त्याच दिवशी पट्टी व बाहेरील खरेदीदार यामुळे शेतमालास चांगला दर मिळत आहे. राज मचाले, अशोक सालपे, जगदिश गुगळे, महावीर शहा, सतिश गावडे शशिकांत सालपे हे खरेदीदार आहेत. मुख्य बाजार आवारात ज्वारीची एकुण ३७३ क्विंटल आवक होऊन इतर भुसार मालाची प्रामुख्याने बाजरी,गहु, खपली, हरभरा, उडीद, मुग  इत्यादी शेतमाल आवक होऊन त्यास चांगले दर मिळत असल्याची माहिती प्रभारी सचिव हौसेराव कोकरे यांनी दिली. बाजार आवारात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला शेतमाल बारामती बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन समिती तर्फे करणेत येत आहे.

No comments:

Post a Comment