डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जळोची येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 15, 2023

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जळोची येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जळोची येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जळोचीत घरा-घरात संविधान उपक्रम

बारामती: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जळोची येथे प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जळोची येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,महेंद्र गोरे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.बाबासाहेबांच्या जंयत्ती निमित्त संविधानाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जळोची येथे घरा-घरात संविधान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची उद्देशपत्रिका वाटप करण्यात आल्या.
     तसेच जळोची परिसरातील विद्यार्थांना शालेय साहित्य तसेच एम.पी.एस.सी पुस्तके गरजू विद्यार्थांना वाटप करण्यात आली.यावेळी किशोर मासाळ,प्रताप पागळे,अतुल बालगुडे,दत्तात्रय माने,अर्जुन पागळे,श्रीरंग जमदाडे,शैलेश बगाडे,गणेश काजळे,मानसिंग सुळ,गणेश सातकर,प्रमोद ढवाण,गणेश पागळे,धनंजय जमदाडे,तानाजी सातकर,नवनाथ मलगुंडे,शेखर सातकर,किरण शेंडगे,निलेश सातकर,उमेश कुदळे,गणेश मासाळ,महेश शिंदे,बाळू बनकर,मोहन कांबळे,शुभम कांबळे,चेतन कांबळे,विकी कांबळे,विशाल कांबळे,आदर्श कांबळे,संघर्ष कांबळे,संदिप भोसले तसेच जळोची परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचालन संचालन सलीम सय्यद यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,महेंद्र गोरे यांनी केले होते.
----------------------------------------------

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सबंध भारत देशातील नागरीकांच्या कल्याणासाठी आहे. तसेच संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरीकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय बहाल केले आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवून महामानवांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्ते,स्वप्निल कांबळे

No comments:

Post a Comment