नितीन सुक्रे यांना वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 8, 2022

नितीन सुक्रे यांना वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार..

नितीन सुक्रे यांना वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार..
लोणी धामणी -- (प्रतिनिधी कैलास गायकवाड ):- ता.८/४/२०२२ खडकवाडी तालुका आंबेगाव येथील कै. हभप बाळासाहेब कारभारी सुक्रे यांच्या स्मरणार्थ "वारकरी संप्रदाय भूषण सदानंद गुरूजी आळंदीकर" हा मानाचा युवा पुरस्कार दरवर्षी एका संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकास अक्षय संगीत संस्था भोसरी, अध्यक्ष व संस्थापक श्री  पांडुरंग बाळासाहेब सुक्रे (संगीत विशारद) यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या वर्षी हा पुरस्कार खडकवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात ७/३/२०२२ रोजी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक श्री शिवाजीराव ढोबळे व पुणे जिल्हा परिषदेच्या मा अध्यक्षा सौ. शैलजा शिवाजीराव ढोबळे यांच्या हस्ते  गायक व वादक नितीन ज्ञानेश्वर सुक्रे यांना देण्यात आला झाले. त्या वेळी अक्षय संगीत संस्थेचे अध्यक्ष  पांडुरंग बाळासाहेब सुक्रे, ज्ञानेश्वर माऊली पोखरकर  विठ्ठल सुक्रे, नामदेव  सुक्रे,संतु सुक्रे, ज्ञानेश्वर माऊली सुक्रे. प्रसिद्ध गायक कैलासबुवा नाथ कृपा पतसंस्था   संस्थापक अध्यक्ष  उदयशेठ डोके, शंकर किसन वाळुंज, माजी चेअरमन  दत्तात्रय बाबूराव सुक्रे यांच्या उपस्थितीत झाले. गावचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते कैलास वासी बाळासाहेब सुक्रे हे खडक वडील गावातील अध्यात्मिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या नावाने संगीत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तीस  हा पुरस्कार दिला जातो. यावेळी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते
 स्वर्गीय बाळासाहेब सुक्रे यांचे चिरंजीव प्रसिद्ध गायक पांडुरंग सुक्रे हे अक्षय संगीत संस्थेचे अध्यक्ष आहेत.

No comments:

Post a Comment