तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फे 50 गरीब कुटुंबे दत्तक...पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रम.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फे 50 गरीब कुटुंबे दत्तक...पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रम.!

तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फे 50 गरीब कुटुंबे दत्तक...पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी: - तुषारभाऊ शिंदे युवा मंच यांच्या वतीने काल दिनांक 24/5/2022 रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पन्नास कुटुंबांना दत्तक घेऊन नायगाव येथे जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. तुषार भाऊ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नायगाव येथे सुरेखा तुकाराम भोसले यांच्या निवासस्थानी आर्थिक दृष्ट्या दुर्बल 50 कुटुंबांना किट वाटप करण्यात आले. तसेच काही दिव्यांग पुरुष व महिला यांनाही यावेळी किट दिले.  तुषारभाऊ शिंदे यांच्या वतीने हा कार्यक्रम मा श्री संभाजी नाना होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली केला. या सामाजिक कामाला त्यांना राजेश टोपे यांचा देखील पाठिंबा असतो. समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले यांच्या घरी नायगाव पुणे मध्ये उपस्थिती प्रमुख पाहुणे  अभिजित जानराव, उमेश जगताप क्षीरसागर, प्रमोद बोराटे, शेवराआई ज्ञानदेव भोसले, पत्रकार स्नेहा उत्तम मडावी, तुकाराम ज्ञानदेव भोसले,
प्रेमीला उत्तम मडावी, सुजाता ज्ञानदेव भोसले, ज्ञानदेव शिलेदार भोसले, नायगाव ग्रामपंचायत, नायगाव क्लार्क पंढरीनाथ चौधरी 
उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल पन्नास कुटुंबाना दत्तक घेतले आहे आणि त्यांनी ज्या वेळी गरज लागेल त्या वेळी मदत करत राहीन, किट व शालेय साहित्य वाटप करत राहणार आहे त्यामुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे असे मत तुषार शिंदे यांनी मांडले. तुषार भाऊ युवा मंच गेल्या चार वर्षे झाले गरिबांना मदत करत आहेत. तुषार भाऊ शिंदे यांनी या माध्यमातून समाजामध्ये नवीन आदर्श निर्माण केला आहे.

No comments:

Post a Comment