वाळुंज नगर येथील क्रिकेट स्पर्धेत काळभैरवनाथ क्रिकेट क्लब अव्वल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

वाळुंज नगर येथील क्रिकेट स्पर्धेत काळभैरवनाथ क्रिकेट क्लब अव्वल..

वाळुंज नगर येथील क्रिकेट स्पर्धेत काळभैरवनाथ क्रिकेट क्लब अव्वल..
 पारगाव :प्रतिनिधी पियुष गायकवाड:- ता.२४
 वाळुंज नगर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. शरद बँकेचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य युवक नेते विवेक वळसे पाटील यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग घेतला. यावेळी सविंदणे तालुका शिरूर येथील काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब या संघाला प्रथम पुरस्कार मिळाला. एकूण संघांना 60 हजार रुपये व चषक वितरण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अंकित जाधव, माजी सरपंच महिंद्रा वाळुंज, वडगाव पीर चे उपसरपंच आण्णा पोखरकर, शिरदाळे चे सरपंच मयूर सरडे उपस्थित होते. दुसरा क्रमांक एस एस फायटर्स खडकी, तिसरा क्रमांक राहुल हिंगे पाटील पोलीस क्रिकेट क्लब अवसरी बुद्रुक चौथा क्रमांक स्वामिनी क्रिकेट क्लब लोणी यांना मिळाले. बक्षिसाचे वाटप विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोणीच्या सरपंच उर्मिला धुमाळ,उदय डोके, उद्योजक राजू वाळुंज,उद्योजक सुमित वाळुंज, बबन वाळुंज, मनोज वाळुंज, प्रदीप वाळुंज, उपसरपंच महेंद्र वाळुंज उपस्थित होते.

No comments:

Post a Comment