भिगवण अपहरण प्रकरण.. अझर शेखला पोलिसांनी केली अटक.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 27, 2026

भिगवण अपहरण प्रकरण.. अझर शेखला पोलिसांनी केली अटक.!

भिगवण अपहरण प्रकरण.. अझर शेखला पोलिसांनी केली अटक.!
भिगवण:-नुकताच गेले काही दिवस झाले भिगवण येथील मुलीचे अपहरण प्रकरण चांगलेच गाजले आहे याप्रकरणी नुकताच पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दि.27 फेब्रुवारी रोजी अझर शेखला अटक केली आहे. दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्ह्या दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता.तो अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. याशिवाय गेला आठवडाभर भिगवण प्रकरण जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, त्यामधील आरोपी तरुण जहीर आणि आयान शेख यांचा तो नात्याने चुलता आहे. दरम्यान, अझर शेख हा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. यालाच अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची मागणी केली जात होती.दरम्यान,अझर शेखवर तलाठ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप होता. या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. अवैध वाळू उपसा प्रकरणी अझरने स्वामी चिंचोली या गावातल्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केली होती.याप्रकरणात त्याला मदत करणाऱ्या युवराज मेंगवाडे
नामक तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे.
स्टेटसमुळे आरोप भिगवणमधील तरुणीचं कथित अपहरण प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा त्या प्रकरणातील तरुण- तरुणी हे बारामती पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्याआधी काही तासांपूर्वी अझर शेखने सोशल मीडियावरुन एक
स्टेटस शेअर केलं होतं. ज्यामध्ये त्याने सदैव एकनिष्ठ असं लिहिलेलं होतं. त्यामुळे भिगवण प्रकरणामध्ये अझरचाच हात असल्याची चर्चाही सुरु झाली होती.अझरवर दौंड परिसरातील विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला आता स्थानिक पोलिसांनी अटक करुन ताब्यामध्ये घेतलं आहे.दरम्यान, आता त्याला दौंड न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.जेव्हा भिगवण प्रकरण सुरु झालं होतं तेव्हा मुलीने आईबरोबर जाण्यास नकार दिला होता. तिने मी स्वतःच्या मर्जीने मुलाबरोबर आली असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर जेव्हा इंदापूर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली त्यावेळी मात्र संबंधित तरुणीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली होती.यामुळे आत्ता या प्रकरणाला नवीन वळण आले आहे.

No comments:

Post a Comment