बारामतीतील तरुणाने पत्नीचा गळा चिरून अंगावर कार घालून कर्नाटकात भररस्त्यात केली निर्घृण हत्या... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 27, 2026

बारामतीतील तरुणाने पत्नीचा गळा चिरून अंगावर कार घालून कर्नाटकात भररस्त्यात केली निर्घृण हत्या...

बारामतीतील तरुणाने पत्नीचा गळा चिरून अंगावर कार घालून कर्नाटकात भररस्त्यात केली निर्घृण हत्या...
बारामती :-चारित्र्याच्या संशयातून पतीने
आपल्या २८ वर्षीय पत्नीचा गळा चिरून आणि
तिच्या अंगावर कार घालून निर्घृण खून केल्याचा
आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य मूळचे बारामती येथील असून, ते देवदर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते.गाणगापूरकडे जात असताना बल्लुरगी परिसरात पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.हा वाद इतका वाढला की,संतापलेल्या पती अक्षयने पत्नी शैलाला कारमधून बाहेर ओढून काढत तिच्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या घटनेचा संपूर्ण प्रकार तेथील स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, त्याचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करताना स्पष्ट दिसत आहे,यानंतर अक्षयने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने शैलाचा गळा चिरला. इतक्यावरही तो थांबला नाही,तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या
अंगावरून कार घालून तिला चिरडले. या भीषण
प्रकारात शैलाचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, या हत्येचा कट पूर्वनियोजित असावा,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
देवदर्शनाच्या बहाण्याने अक्षयने पत्नीला कर्नाटकात आणून हा कट रचला असावा, अशी शक्यता तपासात पुढे येत आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. बारामतीतील नागरिकांचा कर्नाटकमध्ये ॲक्सिडेंट झाला असल्याची अफवा पसरली होती.परंतु काही तासानंतर पतीने पत्नीची क्रूरपणे हत्या केली असल्याचे समजले. कलबुर्गी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित अक्षयला अटक केली असून,पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment