पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातुन पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातुन पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली..

पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातुन पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली..
पिंपरी चिंचवड:- पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने कौटुंबिक कलहातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. विजय कोळी असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरटीपीसी (RTPC) म्हणून कार्यरत असलेले विजय कोळी हे दोन दिवसांपूर्वी घरगुती वादातून
कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते.स्वत: सोबत नेली पिस्तुल विजय कोळी यांनी जाताना स्वतःसोबत सरकारी पिस्तूल घेऊन गेल्यामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. मागील दोन दिवसांपासून विजय कोळी यांचा सर्वत्र त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. पण, कुठेच त्यांचा पत्ता लागत नव्हता. निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात ते शेवटचे दिसून आल्याने पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्यानेही संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. अखेर आज शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.स्थानिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.विजय कोळी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे
विजय कोळी हे मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणामुळे तणावाखाली होती. कौटुंबिक वादाच्या कारणातून ते घरातून निघून गेले होते आणि तणावातून त्यांनी स्वतःच्याच सरकारी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झालं. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment