बारामती:- बारामतीत सद्या आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत आहे,मानसिक त्रास,आजारपण, सावकारी तगादा,कर्ज अश्या अनेक प्रकारे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे प्राथमिक अंदाजे कळतंय,नुकताच बारामतीत निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे(सध्या रा. बारामती,कसबा) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून शहरात चर्चेला उधाण आले आहे, रेल्वे उड्डाण पुलानजीक रेल्वे ट्रॅकच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे मुंडके वेगळे व धड वेगळ्या अवस्थेत आढळून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश बनसोडे हे
दीर्घकाळ आजारपणाने त्रस्त होते व त्यातून कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून,स्थानिक नागरिकांनी रेल्वे ट्रॅकजवळ
मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, वरील सर्व माहिती ही अधिकृतरीत्या अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नसून,अधिकृत माहिती
मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेबाबत बारामती पोलीस पुढील तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment