चेक न वटल्याच्या खटल्यात आरोपीस तब्बल सत्यान्नव लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश व तीन महिना तुरुंगवासाची शिक्षा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 25, 2026

चेक न वटल्याच्या खटल्यात आरोपीस तब्बल सत्यान्नव लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश व तीन महिना तुरुंगवासाची शिक्षा..!

चेक न वटल्याच्या खटल्यात आरोपीस  तब्बल सत्यान्नव लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश व तीन महिना तुरुंगवासाची शिक्षा..!
बारामती:- पुणे येथील मे. सिव्हिल जज्ज सीनियर डिव्हिजन व प्रमुख न्यायदंडाधिकारी श्री आनंद एस. मुंढे साहेब यांनी आरोपी स्पंदन मेडिकेअर चे प्रोप्रारायटर श्री जगदीश बाजीराव कदम रा. समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे याना तारीख 21/9/2026 रोजी तुरुंगवास, नुकसानभरपाई रक्कम रुपये 97,00,000 फिर्यादीला  देण्याचा आदेश दिला. 

फिर्यादी युनायटेड मेडिकल सोलूशन कंपनी तर्फे जयदीप दत्ताराम कुंभार रा. वारजे. पुणे यांनी सदर खाजगी तक्रार कोर्टात दाखल केली होती. 

 आरोपी  व फिर्यादी हे व्यावसायिक मित्र होते. फिर्यादी यांची मेडिकल व्यवसायसाठी लागणारी मशिनरी पुरवण्याची फर्म होती. आरोपीने वेळोवेळी अशी मशिनरी फिर्यादी कडून घेतली होती. परंतु त्याची परतफेडीची रक्कम वेळेत देता आली नव्हती. त्यामुळे त्याने त्यांच्या परतफेडीच्या पोटी रुपये 88,59,903 चा चेक फिर्यादी याना लिहून व सही करून दिला. व चेक वटेल अशी हमी दिली होती. 
फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी *अँड विशाल विजयकुमार बर्गे रा. बारामती* यांच्या मार्फत फौजदारी खटला पुणे कोर्टात दाखल केला होता. 
 
फिर्यादी तर्फे *अ‍ॅड विशाल बर्गे* यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की,  चेक बाबत फिर्यादी गैरवापर करू नये म्हणुन आरोपीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बॅंकेत जाऊन चेक बाबत स्टॉप पेमेंट केले नाही. तसेच वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वताची बाजू मांडली नाही. आरोपीने चेक वरील सही नाकारली नाही . या युक्तिवादाच्या समर्थनार्थ  सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील *श्री अँड विशाल बर्गे*  यांनी कोर्टात सादर केले. 

हा अँड विशाल बर्गे यांचा युक्तिवाद मान्य करून मे कोर्टाने आरोपीस तुरूंगवास, दंड तसेच नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.

No comments:

Post a Comment