बारामती-गोजूबावा मार्गे एसटी बस सेवा सुरू; ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय टळली!तुषार गटकळ यांच्या विशेष प्रयत्नांना यश; उत्साहात पूजन करून बसचा शुभारंभ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 21, 2026

बारामती-गोजूबावा मार्गे एसटी बस सेवा सुरू; ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय टळली!तुषार गटकळ यांच्या विशेष प्रयत्नांना यश; उत्साहात पूजन करून बसचा शुभारंभ..

बारामती-गोजूबावा मार्गे एसटी बस सेवा सुरू; ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय टळली!
तुषार गटकळ यांच्या विशेष प्रयत्नांना यश; उत्साहात पूजन करून बसचा शुभारंभ..
बारामती / गोजूबावी:-एसटी महामंडळातर्फे बारामती ते गोजूबावी ही बहुप्रतिक्षित बस सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या नव्या बस सेवेमुळे गोजूबावी गावातील विद्यार्थी, नागरिक, महिला आणि रोजच्या प्रवाशांची बारामतीला जाण्या-येण्यासाठी होणारी मोठी गैरसोय आता कायमची दूर झाली असून गावात आनंदाचे वातावरण आहे.ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी गोजूबावी गावातील तुषार गटकळ यांनी विशेष पाठपुरावा व अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ही बस सुरू करण्यासाठी बारामती बस डेपोचे प्रमुख कुलदीप दुबल सर, आकाश जगताप सर, विशाल सावंत सर तसेच पुणे डेपोचे प्रमुख दळवी सर यांनी विशेष सहकार्य व मदत केली. याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले. सोमवारी या बस सेवेचा शुभारंभ रेखाताई सूर्यवंशी, लताताई रणदिवे आणि तुषार गटकळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पूजन करून करण्यात आला.या प्रसंगी माजी उपसरपंच रामा भिसे, पोलीस पाटील नितीन गटकळ, बारामतीचे युवा उद्योजक आसिफ भाई सय्यद, उद्योजक हनुमंत सातपुते, उद्योजक नितीन हागारे, युवा नेते याकूब भाई शेख, रहमानभाई शेख, चंद्रकांत सावंत, सचिन गावडे, चेअरमन पांडुरंग जाधव, प्राथमिक शाळा अध्यक्ष दादा आटोळे, मच्छिंद्र सूर्यवंशी, सचिन जाधव, बाळासाहेब जाधव, नदू शेठ बगाडे, अंबादास आटोळे, बाळासाहेब कुंभार, अतुल जाधव, संजय जाधव दिपक केसकर यांच्यासह चालक अशोक पिंगळे व वाहक नितीन कुंभार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नियमित सेवेचा नागरिकांना मोठा फायदा होईल सोमवारपासून गोजूबावी ग्रामस्थांसाठी ही एसटी बस सेवा नियमित (कंटिन्यू) सुरू राहणार आहे. या बससेवेमुळे मुख्यत्वे शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना बारामती शहराशी जोडणे अधिक सोपे होणार आहे.

No comments:

Post a Comment