धक्कादायक..गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून,संशयित आरोपी अटक,पोलिसांची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2026

धक्कादायक..गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून,संशयित आरोपी अटक,पोलिसांची कारवाई..

धक्कादायक..गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून,संशयित आरोपी अटक,पोलिसांची कारवाई..
बारामती :- बारामती तालुक्यातील पणदरे येथील एमआयडीसी परिसरातील गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली,माळेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या दोन तासांत संशयित गणेश रामचंद्र माने (वय २६) याला ताब्यात घेऊन अटक केली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणी मयत महिलेची सासू *** ***  पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(*** *** **** मयत महिलेचे नाव जाहीर केले नाही).पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पवार व त्यांची पत्नी *** हे पणदरे एमआयडीसी परिसरात राहत होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पवार रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली
असता *** या रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे
प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. त्यातून गणेश माने याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले,पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने आरोपीने *** यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेने विरोध केल्यानंतर तसेच घटनेची माहिती
इतरांना कळू नये, यासाठी आरोपीने टॉवेलच्या
साहाय्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. दरम्यान, मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि पायातील पैजण आरोपीने काढून नेल्याचेही तपासात समोर आले आहे.
शवविच्छेदनादरम्यान ***  या गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर, मानेवर तसेच गुप्तांगावर गंभीर दुखापती आढळून आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून घटनेच्या वेळी त्याने परिधान केलेले कपडे तसेच मयत महिलेचे सोन्याचे डोरले व पैजण जप्त केले आहेत. आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद खिरसागर,सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस
उपनिरीक्षक देविदास साळवे, अनिल ओमासे, संजय मोहिते, पोलीस हवालदार महेश पटारे, विजय वाघमोडे,अजय अवकडे, विष्णू गायकवाड, सोफिया शेख,पोलीस अंमलदार अमोल कोकरे, अजिंक्य कदम,श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, विकास राखुंडे, जयसिंग कचरे, राजू शिंदे, सागर पवार व
सुलतान डांगे (स्था. गु. शा.) यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत

No comments:

Post a Comment