50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकला ४ दिवसांची पोलीस कोठडी..
हडपसर:- लाच घेतल्याप्रकरणी नुकताच पोलीस अधिकारी अटक झाल्याची धक्कादायक माहिती अशी की,लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर यांना ५० हजार रुपयांची लाच
स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून,न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कृष्णा बाबर यांना १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी
मिळाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे घटकाकडे ५७ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(३),३१८(५) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय कृष्णा बाबर यांच्याकडे होता.गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये, तसेच तक्रारदाराचा मुलगा प्रतिक याच्या उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता, तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने ८ सप्टेंबर रोजी सापळा रचला. मांजरी येथील १५ चौक परिसरात शितलादेवी मंदिरासमोर, श्रीकांत ट्रेडिंग दुकानाजवळ हा
सापळा लावण्यात आला. बाबर यांनी त्यांच्या सियाज कारमध्ये पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री ११.०२ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने बाबर यांना १२ सप्टेंबरपर्यंत
पोलीस कोठडी दिली आहे.ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके हे पर्यवेक्षण अधिकारी होते.पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, महिला पोलीस शिपाई वैशाली माकर आणि चालक पोलीस हवालदार दीपक
काकडे यांचा सापळा पथकात समावेश होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आता चार दिवसांच्या पोलीस कोठडीत
तपास यंत्रणा लाच मागणी आणि स्वीकारण्यामागील संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार असल्याचे समजत आहे.
No comments:
Post a Comment