चेक बाऊंस खटल्यात ठोठवली ६ महिन्यांची शिक्षा न्यायाधीश श्री.प्रितेश भंडारी यांचा महत्वपुर्ण निकाल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

चेक बाऊंस खटल्यात ठोठवली ६ महिन्यांची शिक्षा न्यायाधीश श्री.प्रितेश भंडारी यांचा महत्वपुर्ण निकाल..

चेक बाऊंस खटल्यात ठोठवली ६ महिन्यांची शिक्षा न्यायाधीश श्री . प्रितेश भंडारी यांचा महत्वपुर्ण निकाल..
बारामती :-बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील श्री. शंकर विठ्ठल काळे यांनी कन्हेरी गावातीलच श्री. संतोष
सोमनाथ करे यांना दुध डेअरी व्यवसायासाठी हात उसनी रक्कम रू.१५,००,०००/- पंधरा
लाख रू. फक्त व तसा करारनामा करून दिला होता. व करारनाम्यात नमुद केल्याप्रमाणे
सदरची रक्कम १ वर्षाच्या आत परत करण्याचे कबुल करून, २ धनादेश करे यांनी श्री.
शंकर काळे यांना दिले होते.
श्री. शंकर काळे यांनी सदरचे दोन्ही धनादेश त्यांच्या खात्यावरती बँकेत भरले असता,
ते न वटता परत आले. त्यामुळे त्यांनी बारामती येथील न्यायालयात खटला दाखल केला
होता. सदरचा खटला दिवाणी न्यायाधीश सोो. वरिष्ठ स्तर व ज्युडि. मॅजि. सोो. वर्ग-१ श्री.
प्रितेश भंडारी सोो. यांच्या कोर्टामध्ये चालला. सदर खटल्यामध्ये फिर्यादी श्री. शंकर काळे
यांच्या वतीने फौजदारी प्रसिध्द वकील अॅड. राजेंद्र काळे यांनी काम पाहिले. फिर्यादीतर्फे
फिर्यादी स्वतः व दोन साक्षीदार यांचा पुरावा तसेच न वटलेले धनादेश, करारनामा,
मेमो, वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, पोस्टाची रिसीट, नोटीस बजावल्याची पोहोच, असे
सर्व पुरावे फिर्यादीच्या पुष्टयार्थ दाखल केले. सदर खटल्यात आरोपींने त्याच्या बचावासाठी
वेगवेगळे बचाव घेवुन अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रामुख्याने सिक्युरिटी म्हणुन चेक
दिला होता, नोटीसची बजावणी झाली नाही, व इतर अनेक आक्षेप घेतले होते.
बॅकेचे
परंतु, न्यायाधीश प्रितेश भंडारी सो., यांनी फिर्यादी व आरोपी यांच्या वतीने
दाखल केलेल्या सर्व कागदोपत्री पुरावा व तोंडी पुरावा याचे विस्तृत सविस्तर विवेचन करून,
निकालाअंती आरोपी श्री संतोष करे यास दोषी धरून ६ महिने तुरूंगवास व
३०,००,०००/- तीस लाख रू. अशी शिक्षा सुनावली. सदर तीस लाख रू. ३०
दिवसांच्या आत भरून सदर दंड रक्कमेमधुन २९,९०,०००/- रू. नुकसान भरपाई म्हणुन
फिर्यादी यांना देण्यात यावी. व रक्कम रू.१००००/- दंड म्हणुन मे कोर्टामध्ये जमा करावी,
असा महत्वपुर्ण निकाल बारामती येथील न्यायाधीश श्री. प्रितेश भंडारी सोो, दिवाणी
न्यायाधीश सोो. वरिष्ठ स्तर व ज्युडि. मॅजि. सोो. वर्ग- १. यांनी दिला.
सदर खटल्यामध्ये फिर्यादींच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना
सहकारी म्हणुन अॅड.आदेश काळे, अॅड. अजित शेरकर, ॲड. अमोल आटोळे, अॅड. श्रीकांत
काटे, अॅड.प्रगती माळवे, अॅड. कांचन कदम, अॅड. नंदिनी मदने, ॲड. आरती कदम, अॅड. तुषार
कवडे, अॅड. मनिष जाधव, अॅड. संतोष भोईटे, अॅड. आकाश साबळे यांनी सहाय्य केले.

No comments:

Post a Comment