शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवेंचे व्याख्यान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवेंचे व्याख्यान..

शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवेंचे व्याख्यान.. 
बारामती:- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी,व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम शुक्रवार दि.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील महात्मा फुले नगर,आमराई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.कालकथित - झुंबरलाल अहिवळे,कालकथित - नानुबाई अहिवळे आणि कालकथित - उषाताई अहिवळे यांच्या संयुक्त स्मृतिदिनामित्त मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दरम्यान,आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून सध्याचे ज्वलंत प्रश्न, समाज प्रबोधन आणि सकारात्मक विचार मांडणाऱ्या नितीन चंदनशिवेना ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment