बारामतीत 31 ऑगस्ट विमुक्त दिन सेटलमेंट जागेवर साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

बारामतीत 31 ऑगस्ट विमुक्त दिन सेटलमेंट जागेवर साजरा..


बारामतीत 31 ऑगस्ट विमुक्त दिन सेटलमेंट जागेवर साजरा..
बारामती :- टकारी समाजाला ब्रिटीश सरकारने 1871 च्या गुन्हेगारी जाती जमाती प्रतिबंध कायदाने जन्मजात गुन्हेगार जमाती म्हणून घोषित करून तारेच्या कुपनात बंधिस्त केले होते.भारत देश स्वतंत्र झाला तरी हा कायदा अस्तित्वात होता पण 31 ऑगस्ट 1952 साली भारत सरकाने हा कायदा रद्द करून या जमातींना विशेष मुक्त केले. तेंव्हापासून या
जमाती 31 ऑगस्ट हा विमुक्त दिन म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.याही वर्षी साजरा करीत असून 
बारामती मध्ये टी. सी.कॉलेज रोड, प्रांत साहेब निवास स्थान समोर, 8 नंबर शाळे मागे,मिशन ग्राउंड बारामती. येथे भामटा सेटलमेंटची जागा आहे,येथे भामटा म्हणजेच टकारी समाजाचे लोक एकत्र येऊन दरवर्षी 31 ऑगस्ट 2026 हा विमुक्त दिन सोहळा साजरा करतात .भारतात 52 सेटलमेंटची नोंद असून यापैकी बारामतीत भामटा सेटलमेंट होते आजही त्याचे पुरावे आहेत,असे असताना बारामती तहसील विभागातून चुकीची नोंद लागली असे सांगून त्यामध्ये खाडाखोड करून सातबाराचे नाव उडविले याचे पुरावे आहेत,जाणून बुझून बारामतीतील भामटा सेटलमेंट ची जागा कागद पत्रावरून गायब करण्यात आले असून त्यासाठी समस्त टकारी समाज कायदेशीर लढा देत असून यापुढेही देणार असून याबाबत आपण '31 ऑगस्ट विमुक्त दिनाचे' औचित्त साधून समस्त बारामती टकारी समाज  बांधव यांनी येऊन या जागेवर पुष्पहार व फुले वाहून वदंन केले यावेळी अनेक टकारी समाज बांधव उपस्थित होते, तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अनिल गायकवाड मा. उपगराध्यक्ष, संतोष जाधव, बाळासाहेब (अनिल )गायकवाड,सुभाष आप्पा जाधव, शेखर गायकवाड, गणेश गायकवाड, संजय गायकवाड, विलास तात्या गायकवाड, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण जाधव,अनिल जाधव, सागर गायकवाड, बाबूराव गायकवाड, रमेश जाधव, अशोक जाधव,हरी गायकवाड, नंदकुमार जाधव, माणिक जाधव, मच्छिन्द्र जाधव,निलेश जाधव,सुरेश जाधव सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment