मुंबई :-ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि पार्थ पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर..राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परस्परांवर टोकाची टीका
करणारे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत 'कोअर कमिटी'ची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करणे टाळणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठका या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणात पुन्हा एका मोठ्या 'रि-युनियन'ची स्क्रिप्ट लिहीली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.२०२९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तळागाळातील कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच २९ ऑगस्टच्या या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श प) अध्यक्ष शरद पवार यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. ज्येष्ठ नेते पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि पार्थ पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर, विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस(श प) मधील ज्येष्ठ नेते आता दुसऱ्या गटातील सदस्यांशी संवाद साधण्यास तयार आहेत.
No comments:
Post a Comment