धक्कादायक..रात्री मुलगी घरातून गेली,पहाटे
बॉडी दिसली;आमदार रोहित पवारांच्या
बारामती:- बारामतीत नुकताच आई व मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली तर दुसरीकडे एका व्यक्तीचा सुद्धा मूत्यू झाल्याची माहिती आहे, अश्यातच वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, खून, खुनाचा प्रयत्न,आत्महत्या,मारामारी असे प्रकार सर्रास पाहायला मिळत असून बारामतीला नक्की काय झालंय सतत घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे, शांत असलेली बारामती आज अशांत होऊ लागली असल्याचे बोलले जात आहे, नुकताच बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. ही मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची मुलगी असल्याची माहिती मिळत आहे.प्राथमिक परिस्थितीत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तिच्या मृत्यूचं नेमकं कारण
अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्याचं मिळालेल्या माहितीनुसारकळत आहे.शनिवारी रात्री या
मुलीचं आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ ती घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेत पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी साईनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मुलीचा मृत्यू आत्महत्या? की अन्य कारणामुळे झाला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.सध्या या प्रकरणात हत्या असल्याचंही स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातूनच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पोलीस अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment