बारामती :- दिनांक 21/8/26 रोजी सकाळी 8:30 वाजण्याचे सुमारास पोलिसांना एक फोन आला होता की दादा पाटील नगर तांदुळवाडी येथे राहणारे एका आईने आणि तीच्या मुलाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेतला आहे
त्यावरून आम्ही पोलीस त्या ठिकाणी गेलो असता त्या मुलाचा वडील त्या ठिकाणी हजर होता त्याने सांगितले की मी काल रात्री कंपनीत सात वाजता ड्युटीला गेलो होतो सकाळी ड्युटी करून आठ वाजता घरी आलो तर घराचा दरवाजा आतून बंद होता तो दरवाजा का उघडत नाही म्हणून आम्ही शेजाऱ्याच्या मदतीने प्रथम हॉलचे खिडकीची काच खोलली त्यावेळेस हॉलमध्ये कोणी दिसत नव्हते त्यानंतर किचनच्या रूमची बाहेरून खिडकी उघडली त्यावेळेस मुलाने गळफास घेतलेला दिसला व आई ही मुलाचे गळफास घेतलेले दिसले त्यामुळे शेजारी राहणारा सुरज याचे मदतीने आम्ही दरवाजा आतून लावलेला होता तो बाहेरून तोडला आणि मध्ये प्रवेश करून पाहिले तर मुलाने पत्र्याचे असलेल्या अडूला गळफास घेतला होता व आई बाजूलाच मयत अवस्थेत उताणे झोपलेल्या अवस्थेत होती,आईच्या गळ्याला दोरीचा किंवा कशाचा तरी व्रण दिसत होता यावरून दोघांनीही आत्महत्या केली असल्याचे असून आले परंतु सदरचे आत्महत्या का केली याबाबत आणखी समजून आलेली नाही सदर प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून तपास चालू आहे सदर घटनेच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली असून सदर घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुधीर काळे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment