बारामतीत गणवेशासाठी विरोधी पक्षनेत्या आरती शंकर गव्हाळे यांचे आंदोलन; दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी.
बारामती:-बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वेळेत उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेत्या आरती शंकर गव्हाळे यांच्या वतीने आज बारामती नगरपरिषदेसमोर शांततामय निषेध आंदोलन करण्यात आले.
दि. १२ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.
यावेळी “आश्वासन नको, गणवेश हवा!”, “विद्यार्थ्यांच्या हक्काचा गणवेश मिळालाच पाहिजे!” अशा घोषणांनी नगरपरिषद परिसर दणाणून गेला.
आंदोलनादरम्यान गणवेश वितरणास दिरंगाई करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच भविष्यात नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश, ड्रेस व दप्तर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी आरती शंकर गव्हाळे म्हणाल्या, “ही मुलं सामान्य कुटुंबातील असली तरी त्यांची स्वप्नं मोठी आहेत. त्यांच्या हक्काच्या गणवेशासाठी त्यांना प्रशासनाच्या दिरंगाईचा सामना करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापुढे गणवेश व शैक्षणिक साहित्य वेळेत आणि उच्च दर्जाचे मिळाले पाहिजे.”
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा आरती शंकर गव्हाळे यांनी दिला. यावेळी बारामती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना मागणीचे निवेदन देताना बारामती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बापू जगताप ज्येष्ठ माजी नगरसेवक सुभाष आप्पा ढोले काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष वीरधवल गाडे एम आय एम चे पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख जनशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव अहिवळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार काळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पैगंबर शेख ,असलम भाई तांबोळी ,केशव बापू भोसले, महेश गायकवाड, रितेश गायकवाड येळे सर, वाघमोडे काका, प्रभाकर बनकर, बापू जाधव, हिंगणे काकाशहाजी जाधव, वृषालीताई बांदल राणी नवले स्मिता साबळे सुनिता साळुंखे भाजपाच्या बारामती शहर महिला अध्यक्ष पिंकी ताई मोरे सायली डहाळे निर्जला शेंडगे रेश्मा शेंडगे प्रियंका गव्हाळे कविता गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment