भिगवण पो स्टे हद्दीतील मदनवाडी येथे दोन आरोपींना एक अवैध गावठी पिस्तुल, तीन काडतूसासह घेतले ताब्यात एकूण ४०,६००/- रू. किंचा मुद्देमाल केला हस्तगत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

भिगवण पो स्टे हद्दीतील मदनवाडी येथे दोन आरोपींना एक अवैध गावठी पिस्तुल, तीन काडतूसासह घेतले ताब्यात एकूण ४०,६००/- रू. किंचा मुद्देमाल केला हस्तगत..

भिगवण पो स्टे हद्दीतील मदनवाडी येथे दोन आरोपींना एक अवैध गावठी पिस्तुल, तीन काडतूसासह घेतले ताब्यात एकूण ४०,६००/- रू. किंचा मुद्देमाल केला हस्तगत..
भिगवण :- स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजनकुमार शर्मा. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी अवैध अग्निशस्त्राचा वापर करून गुन्हे करणारे, अवैध अग्निशस्त्र बाळगणारे अभिलेखावरील आरोपीबाबत विशेष मोहिम राबवून आरोपींचे वाहनांची,राहत्या घरांची कायदेशीररित्या झडती घेवून आक्षेपार्ह चीज वस्तू मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने प्रभावी कारवाई करणेकामी मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला योग्य मागदर्शन करून सुचना केल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके माननीयांचे आदेशान्वये अवैधरित्या अग्निशस्त्रे, गावठी पिस्तुल बाळगणारे, खरेदी-विक्री करणारे, गावठी पिस्तुलचा वापर करून गुन्हे करणारे आरोपीबाबत माहिती घेण्यात येत होती. विशेष मोहिम अंतर्गत कारवाई करण्याचे अनुषंगाने स्था. गु. शा. चे पथक दि. १०/०८/२०२६ रोजी भिगवण पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना
पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने मौजे मदनवाडी गावचे हद्दीतील देवकाते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रोडवर उभे आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने वरिष्ठ अधिकारी यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेतले.कारवाई करणारे पथकाने दोन पंचांना बोलावून घेवून स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने कारवाई करत मौजे मदनवाडी गावचे हद्दीतील देवकाते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सापळा लावून शिताफीने संशयित दोन इसमांकडे चौकशी केली असता त्यांचे नाव पत्ता, १) अविनाश ऊर्फ धीरज अंकुश देवकाते वय २३ वर्षे २) रोहन बाळासो गायकवाड वय २२ वर्षे दोघे
रा. मदनवाडी ता. इंदापुर जि. पुणे असे असल्याचे त्यांनी सांगितले, कायदेशीर प्रक्रीया राबवून पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे अंगझडतीत प्रत्येकाजवळ अवैध रित्या बाळगलेले एक गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतूस असा एकूण ४०,७००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. आरोपी नामे १) अविनाश ऊर्फ धीरज अंकुश देवकाते वय २३ वर्षे २) रोहन बाळासो गायकवाड वय २२ वर्षे दोघे
रा. मदनवाडी ता. इंदापुर जि.पुणे यांना भिगवण पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे विरोधात गुन्हा रजि नंबर २००/२०२६ भा.न्या.सं.क ३ ( ५ ), भा.ह.का. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल कोठून आणले आहे, बाळगण्यामागे त्यांचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास सुरू असून अटक आरोपी यांना मा.न्यायालयात हजर करेणत आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल,. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चैतन्य कदम, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्था. गु.शा. चे पोलीस अंमलदार अजय घुले, योगेश नागरगोजे, निलेश शिंदे यांनी केली आहे. पुढील तपास स्था. गु.शा. व भिगवण पो स्टे चे वतीने करणेत येत आहे.

No comments:

Post a Comment