महिला रुग्णालयात अवयवदान जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 13, 2026

महिला रुग्णालयात अवयवदान जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

महिला रुग्णालयात अवयवदान जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
बारामती(रामायण धर्माधिकारी):- "अवयवदान हेच श्रेष्ठ जीवनदान" हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 'जुग जुग जिओ' अभियानांतर्गत महिला रुग्णालय, बारामती येथे अवयवदानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना अवयवदानाचे महत्त्व, त्याबाबतचे गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेक इच्छुक नागरिकांनी स्वेच्छेने अवयवदानासाठी संमती नोंदवून अवयवदानाची शपथ घेतली आहे. या समाजहिताच्या कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करणाऱ्या सर्व इच्छुक नागरिकांचा सत्कार  करण्यात आला.


हे अभियान महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर बेलदार, सौ. सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.


००००

No comments:

Post a Comment