बारामती तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार,पोक्सो नुसार गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

बारामती तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार,पोक्सो नुसार गुन्हा दाखल..

बारामती तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार,पोक्सो नुसार गुन्हा दाखल..
 बारामती:- बारामती तालुक्यात वाढती गुन्हेगारी तसेच वाढते महिला अत्याचार काही कमी होईना कायद्याचा धाक कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. नुकताच महाविद्यालयात
जाणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सुरज विनायक भोसले (रा. तरडोली, ता.sबारामती, जि. पुणे) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडित तरुणी सुपे येथे महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला मोरगाव येथील चौकात अडवले. मला तुझ्याकडे काम आहे, असे सांगून त्याने तिला दुचाकीवरून कर्हावागज (ता.बारामती) येथील हॉटेल आणि लॉजवर नेले. तिथे त्याने तिला तू मला खूप आवडतेस, मी
तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.तसेच, याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.यानंतरही आरोपीने १३
नोव्हेंबर, १ डिसेंबर आणि १६ डिसेंबर २०२५ रोजी पीडितेला वारंवार धमकावून तिच्यावर अत्याचार केले. तसेच, फोनवर बोलण्यासाठी
दबाव टाकत जिवे मारण्याच्या धमक्या तो देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपी सुरज भोसले याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा(पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ आणि भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२), ३५१(३)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या गुन्ह्याची नोंद हवालदार एस. बी. इनामदार यांनी केली
असून, प्रकरणाचा पुढील तपासbपोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment