कृतीतून जपलेली सामाजिक बांधिलकी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

कृतीतून जपलेली सामाजिक बांधिलकी..!

कृतीतून जपलेली सामाजिक बांधिलकी..!
बारामती :- गोजूबावी व सावंतवाडी परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले.NCMC कार्डची मूळ फी २३० रुपये असताना, महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून वैशाली ताई सावंत आणि अलका गटकळ बाई यांनी नम्रतेने विनंती करून महिलांकडून फक्त २०० रुपये घेतले व उर्वरित ३० रुपये स्वतःच्या खिशातून भरून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला.त्यांच्या या सहकार्यामुळे आज परिसरातील शेकडो गरजू महिला व विद्यार्थिनींना एस.टी. प्रवासात ५०% सवलत (अर्धे तिकीट) मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या शिबिराला गोजूबावी व सावंतवाडी परिसरातील महिलांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि उपस्थित राहून लाभ घेतला त्याबद्दल सर्व महिला भगिनींचेही मनापासून आभार तसेच दोन्ही ताईंच्या या उदात्त कार्याचा सर्व गोजूबावीकरांना सार्थ अभिमान आहे, याबद्दल 
वैशाली ताई आणि अलका बाईंचे मनःपूर्वक आभार मानन्यात आले.

No comments:

Post a Comment