धक्कादायक! अवैध व्यवसायांचे जाळे वाढले; महिला अत्याचाराच्या घटनांनी डोके वर काढले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

धक्कादायक! अवैध व्यवसायांचे जाळे वाढले; महिला अत्याचाराच्या घटनांनी डोके वर काढले..

धक्कादायक! अवैध व्यवसायांचे जाळे वाढले; महिला अत्याचाराच्या घटनांनी डोके वर काढले..
 बारामती :- अवैध धंदेचे जाळे वाढले असल्याचे दिसत असून महिला अत्याचार देखील वाढत चालले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. कायदा सुवेवस्था बिघडत चालली असल्याचे दिसत आहे, पोलिसांचा धाक म्हणावा असा उरला नाही, वाढती गुन्हेगारी कुणामुळे वाढत चालली आहे हे नागरिकांना कळू लागले आहे, तश्या चर्चा ऐकवयास येत आहे. रोज येत असलेल्या अल्पवयीन मुली व महिलावरील अत्याचाराच्या  घटना ऐकून महिलांना आपली सुरक्षितता धोक्यात असल्याचे भासू लागले आहे. तर दुसरी कडे अवैध धंदे वाढत असून जुगार, मटका,दारू, गुटखा,गांजा,लॉजवर होत असलेले वैशाव्यवसाय हे नित्याचीच बाब झाल्यासारखं वाटू लागले असल्याचे काही महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली आहे. आज अजितदादा असते तर असे गुन्हेगारी कृत्य वाढू दिले नसते तात्काळ कारवाईचे आदेश दिले असते. मात्र आज आपल्यात दादा नाहीत यामुळे प्रशासनावर असणारी जरब, दरारा नाहीसा झाला आहे. कदाचित यामुळेच रान मोकळे झाले की काय म्हणून अवैध धंदे व महिला अत्याचार वाढत चालल्याचे दिसत आहे.नागरिकांना पुढे कसे होणार याची चिंता व भीती वाटू लागली आहे. याबाबत लवकरच काही सामाजिक काम करणारे नागरिक पोलीस अधीक्षक व गृहमंत्री यांना भेटणार असून वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे वर कारवाईची मागणी करणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment