बारामती:-बारामतीत सद्या मुलींवर व महिलांवर अत्याचार होत असल्याचे वारंवार घटना घडत आहे हे गेल्या काही दिवसापासून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यावरून दिसत आहे, नुकताच आठ व चार वर्षीय दोघी अल्पवयीन बहिणींशी एकाने अश्लील चाळे करीत गैरवर्तन केल्याचा प्रकार बारामतीत घडला.बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी देविदास नारायण शिवदे (वय ५९, रा.लक्ष्मीआई मंदिराजवळ, कुंभार गल्ली,कसबा, बारामती) याच्याविरोधात
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडितांच्या आईने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यात म्हटले आहे की, फिर्यादीला आठ
व चार वर्षांच्या दोन मुली असून, त्या
कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त
राहत आहेत. ती राहत असलेल्या
ठिकाणी पीडित मुलींच्या अन्य मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्या त्यांच्यासोबत खेळण्यासाठी जात होत्या. शिवदे यांच्याशी या कुटुंबाची तोंडओळख
आहे. दि. ६ रोजी यातील आठ वर्षांची
पीडिता रडत असल्याने फिर्यादीने तिला
दवाखान्यात नेले. त्यानंतर घरी आल्यानंतर पीडितेने तिच्याशी घडलेला प्रकार आईला सांगितला.तिच्या सांगण्यानुसार या दोघा बहिणींना खाऊ-देण्याच्या आमिषाने देविदासने घरी बोलावले. तेथे खाटेवर झोपवून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत गैरवर्तन केले. शाळा चालू झाल्यापासून तो हा प्रकार करीत असल्याचे पीडितेने आईला सांगितले शिवाय याबाबत कुठे काही सांगितल्यास तुम्हाला जिवे मारून
टाकीन, अशी धमकी त्याने या मुलींना दिली होती,असे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिस उपनिरीक्षक अशोक राऊत याप्रकरणी तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment