पतीने पत्नीला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने तिचे डोक्यात लोखंडी हातोडा मारल्या प्रकरणी ७
वर्षाची पतीला शिक्षा सुनावली..
बारामती :- दिनांक ०४/०८/२०२६ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधिश सो श्रीमती एस. आर. पाटील यांनी आरोपी नामे विलास दादा नेटके मु.पो.
सहजपुर ता. दौंड जि. पुणे. याने ललीता विलास नेटके हिला हातातील लोखंडी हातोड्याने
डोक्यास उजव्या बाजूस जबरदुखापत करून जिवे ठार मारून टाकण्याचा प्रयत्न केला
म्हणुन केल्याप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास तसेच दंड म्हणुन १० हजार रूपये व भादवी
कलम ३२३ मध्ये दोषी धरून आरोपी यास ६ महिने शिक्षा तसेच दंड न भरल्यास २
महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १५/०७/२०२० रोजी आरोपी नामे
विलास दादा नेटके मु.पो. सहजपुर ता. दौंड जि. पुणे. याने पत्नी नामे ललीता विलास
नेटके हिच्या चारित्र्यावर संशय घेवून पती याने पत्नीला हातातील लोखंडी हातोडयाने
डोक्याच्या उजव्या बाजूस जबरदुखापत करून जिवे ठार मारून टाकण्याचा प्रयत्न
केला. यवत पोलीस स्टेशन येथे आप्पा सुदाम सकट याने आरोपी विरूध्द फिर्याद दिली
होती. सदर गुन्हयाचा तपास तात्कालीन अधिकारी एन. एस. लकडे यांनी तपास करुन कोर्टात
दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ०९ साक्षीदार तपासले. सदर खटल्या कामी
जखमी ललीता हिचा व मुलगा नामे सुमेश याच्या सह साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या
साक्ष नोंदवण्यात आल्या. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल
ईश्वर वसेकर यांनी कामकाज पाहिले. केसमध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब
नोंदविण्यात आले सदर खटल्याकामी डॉ. शलाका लोणकर यांची साक्ष महत्वाची ठरली
तसेच विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी केलेला युक्तीवाद व वैदयकिय
पुरावा ग्राहय धरुन मे न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०७ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस ७
वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची तसेच
भा. द.वी. कलम ३२३ अन्वये ६ महिनेची शिक्षा ठोठावली आहे.सदर प्रकरणी यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किशोर वागज यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज
पाहिले आहे. तसेच त्यास पोलीस हवालदार वेणूनाद छोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच गोरख कसपटे पो.स.ई व ए.जे. कबडे सहा. फौजदार यांनी पैरवी अधिकारी म्हणून
कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment