बारामती : समस्त साधक परिवार, बारामती यांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असून दि. 4 ऑगस्ट ते रविवार 9 ऑगस्ट 2026 दररोज स. 8ते 12 संहिता पठण तसेच दररोज सायं 4ते 7 भागवत कथा निरूपण. सांगता समारोह सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9ते 12 भागवत कथा निरूपण व दुपारी 1ते 4 महाप्रसाद अश्या पद्धतीने आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे. या ज्ञानयज्ञासाठी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मूळ चरित्राचे मराठी अनुवादक, सिद्धयोगाचार्य, भागवताचार्य, चैतन्यघन प. पू. सद्गुरू श्री हरिभाऊ जोशी,निटूरकर महाराज (भाऊ महाराज), हैदराबाद यांचे मार्गदर्शन लाभणार
आध्यात्मिक ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा संगम असलेल्या या ज्ञानयज्ञाचा लाभ बारामतीकरांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच या धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी भाविकांनी सहकार्य व सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.स्थळ-वीरशैव मंगल कार्यालय, ओंकारेश्वर हौ. सोसायटी भिगवण रोड, बारामती येथे होणार आहे,अधिक माहितीसाठी संपर्क - संतोष काळे मो -9860024277,विजय झांबरे मो -9822031311,अमोल नरुळे मो -9623930430,शिवांश गायकवाड मो -7741044101,विशाल वजरिनकर मो -9765165000,महेश मेटे मो -7276212712, दिनेश बोरसे मो -7888034949,सचिन खाडे मो -8975015065
No comments:
Post a Comment