वडगाव निंबाळकर पोलीसांनी हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दापाश करून एकूण ८००००० /-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपी जेलबंद
वडगाव निंबाळकर:- पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २२/०७/२०२६ रोजी रात्री ०८.०० वा ते दिनांक २३/०७/२०२६ रोजीचे
सकाळी ०९.०० वा.चे दरम्यान मौजे मुढाळे ता. बारामती जि.पुणे येथील माळशिखारे यांचे हिंदुस्थान पेट्रोलीयम कंपनीचे पंप्पावरून चोरी
झाल्याबाबत दि. २३/०७/२०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं १४६ / २०२६ बी. एन. एस. क. ३०३ ( २ ) प्रमाणे
तक्रार दाखल झाली. त्यानंतर माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहीते यांनी तात्काळ पथक नेमुन गुन्हे
शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे वाळुंज
एम.आय.डी.सी. संभाजीनगर येथुन टिपर व दोन आरोपी ताब्यात घेवुन आरोपी १. राहुल विठ्ठल कराळे वय ३१ वर्षे रा. सिरेगाव
ता. गंगापुर जि. संभाजीनगर २) आरोपी नामे आदित्य रमेश कराळे वय २५ वर्षे रा. सिरेगाव ता. गंगापुर जि. संभाजीनगर यांनी
मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भागवत पाटील हे करीत आहेत.
-
सदरची कारवाई मा.संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती
विभाग, मा. चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन मोहिते सहाय्यक पोलीस
निरीक्षक, पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, पोलीस नाईक भाऊसाहेब
मारकड, पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले, विकास येटाळे यांनी मिळून केली.
No comments:
Post a Comment