इंदापुर पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध गावठी पिस्तुल बाळगणारा आरोपी एकुण ३५,००० रु कि चा मुददेमालासह स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडुन जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2026

इंदापुर पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध गावठी पिस्तुल बाळगणारा आरोपी एकुण ३५,००० रु कि चा मुददेमालासह स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडुन जेरबंद..

इंदापुर पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध गावठी पिस्तुल बाळगणारा आरोपी एकुण ३५,००० रु कि चा मुददेमालासह स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडुन जेरबंद..
इंदापूर :- मा. विशेष पोलीस महानिरीक्षक  कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी कोल्हापुर परिक्षेत्रामधील सर्व
घटक प्रमुख यांना सार्वजनिक गणोशोत्सवाचे अनुषंगाने त्यांचे घटकामधील अवैध अग्नीशस्त्राचा वापर करुन गुन्हे
करणारे स्थानिक जिल्हयामधील व त्याचे शेजारी असणारे परजिल्हयामधील गुन्हेगार, तसेच स्थानिक
जिल्हयामधील अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे सराईत गुन्हेगार यांचेविरुध्द विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश
दिलेले होते. त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा,
पुणे ग्रामीण व जिल्हयामधील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगाराची
माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांकडुन माननीयांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या अग्नीशस्त्रे,
गावठी पिस्तुल बाळगणारे, खरेदी व विक्री करणारे, गावठी पिस्तुलाचा वापर करुन गुन्हे करणारे आरोपींबाबत
माहिती घेण्यात येत होती. विशेष मोहिम अंतर्गत कारवाई करण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक
१७/०९/२०२६ रोजी इंदापुर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग फिरत असताना पथकामधील पो हवा / ब.नं २१८९
अजय घुले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयीत इसम हा स्वत:जवळ गावठी
पिस्तुल बाळगुन बाभुळगाव पाटी ता. इंदापुर जि. पुणे गावचे हददीत पुणे सोलापुर हायवे रोडचे सर्व्हिस रोडला
वीट भटटीजवळ उभा आहे. त्यामुळे मिळालेल्या गोपनीय बातमीचा मजकुर हा वरीष्ठ अधिकारी यांना सांगुन
त्यांचेकडुन कारवाई करण्याचे आदेश प्राप्त करुन घेतले.
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाने कारवाईसाठी दोन पंचांना बोलावुन घेवुन त्याचे समक्ष मौजे
बाभुळगाव ता. इंदापुर जि. पुणे गावचे हददीत पुणे सोलापुर हायवे रोडचे सर्व्हिस रोडलगत असलेल्या वीट भटटीचे
ठिकाणी उभ्या असलेल्या इसमास सापळा लावुन ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्याचे कंबरेला लावलेले
एक सिल्वहर रंगाचे मॅगझीन असलेले गावठी पिस्टल मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव व पत्ता विचारा
त्याने त्याचे नाव सुरज अनिल निकम वय वर्षे २२ रा. आडेगाव ता. माढा जि.सोलापुर असे सांगितले. कायदेशीर
प्रक्रीया राबवुन पथकाने त्याचे अंगझडतीत ३५,००० रु रकमेचा मुददेमाल मिळुन आला आहे.
आरोपी सुरज अनिल निकम वय वर्षे २२ रा. आडेगाव ता. माढा जि.सोलापुर याचे विरुध्द निलेश महादेव
शिंदे पो हवा ब.नं २४१५ स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इंदापुर पोलीस स्टेशन गु
रजि नं ५७३/२०२६ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल सा े, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक
श्री. गणेश बिरादार सा बारामती विभाग, मा. श्री. चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे प्रभारी अधिकारी पो. निरी श्री. प्रमोद क्षीरसागर, इंदापुर
पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे पोलीस तपास पथकात
नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर वाळुंज, पो हवा अजय घुले, योगेश नागरगोजे, निलेश शिंदे,
पोलीस अंमलदार भारत मोहोळ यांनी केलेली आहे. पुढील तपास इंदापुर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा
पुणे ग्रामीण हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment