अभियंता दिन व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

अभियंता दिन व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न..

अभियंता दिन  व तांत्रिक सत्र उत्साहात संपन्न..
बारामती :- इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स,बारामती लोकल सेंटर यांच्या वतीने 15 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल सिटी इन  येथे आयोजित करण्यात आलेला अभियंता दिन  व तांत्रिक सत्र उत्साहात वउत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी  पुणे,फलटण,इंदापूर, लोणंद, पुरंदर, दौंड, श्रीगोंदा, तसेच परिसरातील अनेक अभियंत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील व राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंजी. शामराव राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर इंजी. शहाजी पारकळे यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. त्यांच्या दूरदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्य आणि देशाच्या विकासातील मोलाच्या योगदानाची माहिती उपस्थितांना करून दिली. 

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या तांत्रिक सत्रात प्रख्यात शास्त्रज्ञ व सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. हेमंत धोंडे यांनी "Failure case Studies in Construction With Innovative Solutions" या विषयावर मार्गदर्शन केले. विविध बांधकामांमधील तांत्रिक त्रुटी, त्यामागील कारणे, त्यांचे परिणाम तसेच योग्य अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करून अशा समस्या कशा टाळता येतात याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या व व्यावहारिक पद्धतीने माहिती दिली. उपस्थित अभियंत्यांनी या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ISSE BLC टी-शर्टचे अनावरण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष इंजि. गणेश नरुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन डालमिया सिमेंट ग्रुप व ISSE BLC यांच्या  संयुक्त विद्यमानाने करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता अभियंता दिन निमित्त केक कापून करण्यात आली. यामुळे उपस्थित सर्व अभियंत्यांना एक संस्मरणीय व आनंददायी अनुभव मिळाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *डॉ. स्नेहल वाळके* यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे सर्व सदस्य, पदाधिकारी, मान्यवर पाहुणे आणि सहभागी अभियंत्यांचे आभार *डॉ. गुणवंत काटे* यांनी केले.

No comments:

Post a Comment