धक्कादायक..भरदिवसा तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2026

धक्कादायक..भरदिवसा तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला...

धक्कादायक..भरदिवसा तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला...
 बारामती :-गुन्हेगारी वाढतेय तर गुन्हे देखील वाढतेय..बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील मुख्य चौकात भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.
अमोल सदाशिव जाधव हा हल्ल्यात जखमी झाला,मिळालेल्या माहितीनुसार,काऱ्हाटी गावाच्या मुख्य चौकात अमोल जाधव याच्यावर कोयत्याने हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अमोल जाधव गंभीर जखमी  झाला. त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला
झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काऱ्हाटी गावातील ऋतिक आणि ओमकार या दोघांची नावे समोर येत असून, हल्ल्यामागील नेमके
कारण आणि आरोपींची भूमिका पोलीस तपासातून
स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच सुपे
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यातील
संशयित आरोपींचा शोध सुरू असून, बारामती
 तालुक्यातील विविध गावांमध्ये पोलिसांची पथके
रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे काऱ्हाटी परिसरात भीतीमय वातावरण झाले . या प्रकरणी पुढील तपास  पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment