महिलेवर कोल्डड्रिंक पिण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; व्हिडीओ वायरल करण्याची धमकी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

महिलेवर कोल्डड्रिंक पिण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; व्हिडीओ वायरल करण्याची धमकी..

महिलेवर कोल्डड्रिंक पिण्याच्या बहाण्याने
  जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; व्हिडीओ वायरल करण्याची धमकी..
 बारामती:-बारामती तालुक्यात महिला अत्याचार वाढत असल्याचे मागील काही तक्रारीवरून दिसत आहे, नुकताच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेवर कोल्डड्रिंक पिण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माळेगाव
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक
मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि.पुणे) याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात
गुन्हा क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय
संहिता (BNS) कलम ६४ (२) (एम), ३५१(१) व ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती माहेरी यात्रेसाठी गेली असताना तिच्या भावकीतील आरोपीने कोल्डड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.त्यावेळी काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्या सासरी येत वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा माळेगाव पोलीस ठाण्यात
नोंदविण्यात आला असून पोलीस नाईक सानप
यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास
पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत.

No comments:

Post a Comment