बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मे. एस. आर. पाटील यांनी खुणाच्या गुन्हयातीलआरोपी बाप लेकांना दिली जन्मठेपेची शिक्षा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मे. एस. आर. पाटील यांनी खुणाच्या गुन्हयातीलआरोपी बाप लेकांना दिली जन्मठेपेची शिक्षा...

बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मे. एस. आर. पाटील यांनी खुणाच्या गुन्हयातील आरोपी बाप लेकांना दिली जन्मठेपेची शिक्षा...
बारामती :- दि.१५/०१/२०२१ रोजी मौजे खोरवडी ता. दौंड जि. पुणे येथे
फिर्यादी यांचा मुलगा जपान्या किसन चव्हाण रोजी मौजे खोरवडी येथे राहु नकोस तु
भिगवन येथे तुझे सासरवाडी येथे जाउन रहा आरोपी नं. १ व २ यांनी मयत जपान
किसन चव्हाण यांना उचलून आपटून व डोक्यामध्ये मेक मारूण त्याचा खुन केला.
तसेच घटनेच्या आगोदर सुध्दा सदर मयत इसम जपान्या किसन काळे यास खोरवडी
गावात तु कधीच यायचे नाही म्हणुन वेळोवेळी मारहाण करत होते.या प्रकरणाची हकीकत
आरोपी नामे गोरख आबा काळे व अक्षय आबा काळे याचे विरूध्द दौंड पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हयाची फिर्याद मयताचे आईने दिली होती त्यानुसार दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ४२ / २०२१ भा.द.वी. कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक
नारायण पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र मे न्यायालयात दाखल केले होते. सदर सुरेखा पाटील यांचे प्रकरणाचा पुरावा मे. बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मा.कोर्टात सुरू होता. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले, प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार,
वैधकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांची साक्ष ग्राहय धरूण व सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांचा युक्तीवाद ग्राहय धरूण यातील आरोपीस बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मा. एस. आर. पाटील यांनी दि. १९/०८/२०२६ रोजी भा. द.वी. कलम ३०२ मध्ये दोषी धरून दोन्ही आरोपीस जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा दिली. दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास आशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी १.गोरख आबा काळे २.अक्षय गोरख काळे यांना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांना ॲड. योगेश लालबिगे यांनी तसेच कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार अभिमन्यु कवडे तसेच कोर्ट अंमलदार महिला पोलीस हवालदार मनिषा अहिवळे तसेच सरकारी अभियोक्ता कार्यालयाचे
क्लार्क एस. एस. कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment