देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचा मंगळवारी कृतज्ञता सन्मान सोहळा..
बारामती(रामायण धर्माधिकारी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही समाजहिताचा विचार करून देहदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी देहदान व अवयवदानाचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment