स्वातंत्र्याचा महोत्सव दिनी स्क्रीबल कराओके स्टुडिओ,बारामती व जयहिंद फाउंडेशन, बारामती यांच्या सौजन्याने सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न..
बारामती :- १५ ऑगस्ट २०२६ रोजी *शरद सभागृह, कसबा, बारामती येथे स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यात आला. स्क्रीबल कराओके स्टुडिओ, बारामती व जयहिंद फाउंडेशन, बारामती यांच्या सौजन्याने सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यातील आजी - माजी सैनिक, हुतात्मा शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता व कुटुंबीय, जय जवान आजी - माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री. हनुमंत निंबाळकर,श्री रविंद्र लडकत , बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री ताराचंद शेंडकर साहेब ,माळशिकारे साहेब बारामतीच्या आपल्या देणगीदार सौ. हेमलता परकाळे, जयहिंद फाऊंडेशनचे सन्माननीय पदाधिकारी राष्ट्रीय सचिव श्री. हनुमंत मांढरे, श्री. भास्कर आबा अनपट, श्री. राजेंद्र मांढरे, सौ. सुलभा लोखंडे, सौ. रेणुका काळे, खटाव टीम अध्यक्षा सौ. हेमलता फडतरे, श्री. किसन फडतरे, सौ.स्नेहलता जगताप व कुटुंबीय उपस्थित होते.
बारामती टीमचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप, संतोष शेलार रणजित जगदाळे,दादासो माळवे गणेश जगताप व सचिन कुंभार सर्व सन्माननीय सभासद यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन खूप छान केले होते. प्रा.श्री. सचिन तावरे यांनी नियोजन केले तर श्री.प्रकाश कुंभार सरांनी आभार मानले. श्री. अशोक घोडके बंधूंनी चहा नाश्त्याची सोय केली होती.
आपला राष्ट्रीय सण म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन या दिवशी देशभक्तीपर गीते, आजी - माजी सैनिक व वीर पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थितीमध्ये प्रत्येक गीताच्या गायनानंतर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. स्वातंत्र्य दिनादिवशी एक आगळा - वेगळा कार्यक्रम अनुभवता आला.अशी माहिती
श्री सचिन कुंभार,सचिव बारामती ,जयहिंद फाउंडेशन यांनी दिली.
No comments:
Post a Comment