रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग व आस्थापना प्रतिनिधींची बैठक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2026

रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग व आस्थापना प्रतिनिधींची बैठक..

रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग व आस्थापना प्रतिनिधींची बैठक..
बारामती(रामायण धर्माधिकारी):-कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या 'रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बारामती औद्योगिक वसाहतीमधील उद्योग व आस्थापना प्रतिनिधींची पुर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. या रोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणीनी, महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी  हनुमंत पाटील यांनी केले आहे.

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या 'रोजगार महाकुंभ मेळाव्यात बँकिंग, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोटिव्ह यांसारख्या विविध क्षेत्रांतील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योजक प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून बारामती परिसरातील सर्व औद्योगिक आस्थापना, व्यावसायिक सस्था, आणि बँकिग क्षेत्रातील उद्योजक प्रतिनिधीनी आपल्याकडील रिक्तपदाची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्याकडे सादर करुन उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,असेही श्री. पाटील म्हणाले.

या बैठकीस कार्यकारी अभियंता विजय पेठकर, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे धनंजय जामदार, बारामती क्लस्टरचे  प्रमोद काकडे,शरद सूर्यवंशी, करिअर वर्ल्ड अॅग्रो टीमचे हरिश खाडे, तसेच रा. दे. डोईफोडे, आणि  कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सचिन ढेरे आदी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment