आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित..

आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित.. 
पुणे (बारामती) - एम.सी.एन न्यूज मराठीच्या वतीने देण्यात येणारा 'आदर्श पत्रकार पुरस्कार' पुणे जिल्हा प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना देण्यात आला.एम.सी.एन न्यूज मराठीच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक,वैद्यकीय,पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला,त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे उपमुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख,एम.सी.एन न्यूज मराठीचे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार श्री.कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उद्घाटक श्री.शैलेश काळे (उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद), श्री.पवन पाटील (तहसीलदार), डॉ.सुरज जाधव (मुख्याधिकारी,नगरपरिषद जळगाव जामोद),ॲड.संदीप उगले,श्री.निलेश काळे,श्री.रमेश जाधव,श्री.अमोल चौधरी,डॉ.वाकेकर,श्री.संदीप देशमुख,डॉ.किशोर केला,श्री.सचिन तायडे,मुख्य संपादक शामभाऊ तायडे व संपादक राजुभाऊ वाढे यांच्या शुभहस्ते सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर, बुऱ्हाणपूर रोड,जळगाव जामोद येथे एम.सी.एन न्यूज मराठीच्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी मान्यवरांसह महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधी व वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.त्यांचे वैद्यकिय,सामाजिक,शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असल्यामुळे त्यांना हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment