वालचंदनगर :- खुन प्रकरणातील फरार
आरोपी यांचा शोध घेत त्यांना पकडुन कारवाई करणे बाबत च्या सुचना पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी वेळावेळी केल्या होत्या त्या अनुषंगाने बारामती विभागा मधील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपीची शोध मोहित चालु करणेबाबत
कळविले होते.त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन च्या रेकॉर्डवरील फरार आरोपीचा आरोपींचा शोध घेत असताना इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथील बहुचर्चित उत्तम जाधव खुन प्रकरणातील राजु भाळे टोळीचा सदस्य असलेला आरोपी सोमनाथ बबन पवार, रा. कळंब, ता. इंदापुर, जि. पुणे हा गेले १८ महिन्यापासुन अटकेच्या भितीने फरार होता. वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देत वेशभुषा बदलुन स्वतःला अटकेपासन वाचविण्यासाठी फरार झाला होता. सदर आरोपीवर बेकायदेशीर टोळीचा सदस्य बनुन गुन्हा केल्याने त्याच्यावर मोक्का कायद्या अंर्तगत कारवाई करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुपचूप कळंब, ता. इंदापुर परिसरात येणार असल्याची
खात्रीशीर माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथका मधील अंमलदार यांना मिळाली. त्या अनुषंगाने सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकामधील अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी वेशभुषा बदलुन सापळा रचुन आरोपी हा कळंब मध्ये येताच त्यास शिताफीने ताब्यात घेत त्यास जेरबंद केले.त्यानंतर सदर आरोपीस ताब्यात घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणुन सर्व कायदेशीर प्रक्रिया पार
पाडत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस अटक केल्यानंतर त्यास विशेष मोका न्यायालय शिवाजीनगर, पुणे येथे हजर केले असता न्यायालयाने दिनांक ३१/०८/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वालचंदनगर
पोलीसां कडून करण्यात येत आहे. सदरील कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक
संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार आप्पा दराडे, किर्तीलाल गायकवाड, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर,अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment