'देर आये दुरुस्त आये'..पियाजो कंपनी समोर रोडवर रहदारीस अडथळा होईल अशा परिस्थितीत लावलेल्या 21 कंटेनर वाहनावर दंडात्मक कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

'देर आये दुरुस्त आये'..पियाजो कंपनी समोर रोडवर रहदारीस अडथळा होईल अशा परिस्थितीत लावलेल्या 21 कंटेनर वाहनावर दंडात्मक कारवाई..

'देर आये दुरुस्त आये'..पियाजो कंपनी समोर रोडवर रहदारीस अडथळा होईल अशा परिस्थितीत लावलेल्या 21 कंटेनर वाहनावर दंडात्मक कारवाई..
बारामती :-एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला जड वाहने लावल्याने अनेक अपघात होत होते, नेहमीचीच अश्या वाहना मुळे होत असलेल्या अडचणीची दखल घेतली जात नव्हती त्यातच मुरूम, कच, रेती, खडी, माती वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे देखील अपघात होत असल्याचे पुढे आले आहे, पण म्हणतात ना 'देर आये दुरुस्त आये ' अश्या अडचणीच्या ठरणाऱ्या वाहनावर कारवाई सुरु झाली नुकताच एमआयडीसी हद्दी मध्ये विमानतळा कडून बारामती शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर  पियाजो कंपनीच्या बाहेर रोडच्या कडेला   कंटेनर लावण्यात आले होते, सदर कंटेनर हे रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने लावण्यात आलेले होते सदर 21 कंटेनर वर बारामती तालुका पोलिसांनी 22500 ची दंडात्मक कारवाई केली आहे, 
यापुढे एमआयडीसी परिसरात अथवा बारामती शहरातील इतर मुख्य रस्ते चे ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा परिस्थितीत जर कंटेनर अथवा ट्रक अथवा इतर वाहने लावली तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही रस्त्याचे कडेला रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने वाहने पार्क करू नयेत असे बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे.
 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार वाकळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment