बारामती तालुका पोलीस स्टेशनला चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील १,७०,०००/- रू. चे सोन्याचे मंगळसुत्र फिर्यादीस परत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

बारामती तालुका पोलीस स्टेशनला चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील १,७०,०००/- रू. चे सोन्याचे मंगळसुत्र फिर्यादीस परत..

बारामती तालुका पोलीस स्टेशनला चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील १,७०,०००/- रू. चे सोन्याचे मंगळसुत्र फिर्यादीस परत..
बारामती :- दिनांक ०४/०४/२०२६ रोजी फिर्यादी नामे अनुराधा संतोष पागळे वय ३४ वर्षे, व्यवसाय. गृहिणी रा. जळोची गाव बारामती ता. बारामती जि. पुणे मो. नं. ९७६६७२९९९६ या दि. ०५/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०६/५५ वा. चे सुमारास मौजे कन्हेरी ता. बारामती जि. पुणे येथुन जळोची कडे मोटर सायकलवरुन येत
असताना मौजे कन्हेरी गावचे हद्दीत लाकडी जळोची रोडवर बटरफ्लाय गार्डन चे पुढे त्यांचे पाठीमागुन मोटर सायकलवर येणा-या दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांना थांबवुन गाडीवर पाठीमागे बसलेले इसमाने फिर्यादीचे गळ्यातील एक १३ ग्रॅम वजनाचे दोन डोरले असलेले फॅन्सी मंगळसुत्र जु. वा. किं. अंदाजे १७०,०००/-जबरदस्तीने ओढुन चोरुन नेलेबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिनांक ०५/०४/२०२६ रोजी १२ / ३७ वा. गु. रजि. नंबर १५४/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०४ ३ (५) अन्वये गुन्हा
दाखल करून गुन्हयाचा तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी केला असुन सदर गुन्हयात आरोपी नामे
१) गणेश मंगेश काळे वय २२ वर्षे रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांना तात्काळ अटक करून त्यांचेकडुन वरील वर्णनाचे एक १३ ग्रॅम वजनाचे दोन डोरले असलेले फॅन्सी मंगळसुत्र जु. वा. किं. अंदाजे १७०,०००/- हस्तगत करणेत आला असुन सदरचे मंगळसुत्र आज दिनांक ३१/०८/२०२६ रोजी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ कलम १०६ (३) प्रमाणे फिर्यादीस परत देणेत आले आहेत - सदरची कामगिरी
पोलीस निरीक्षक नारायन पवार  यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे मुद्देमाल कारकुन भारती खंडागळे म.पो. हवा. / ब.नं. १२०० यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

No comments:

Post a Comment