बारामती:- ढोल ताशांचा गजर , डीजे चा नाद आकर्षक रोशनाई आकाशात फडकवणारे भगवी झेंडे , फटाकड्यांची अतिशबाजी , राम भक्तांगणच्या डोक्यांनमध्ये भगवी टोपी गळ्यांमध्ये भगवे गमजे असंख्य भक्तगंणाच्या व सकल हिंदु समाज बांधव तसेच श्रीराम जन्मोस्तव समिती को-हाळे बुद्रुक यांच्या साक्षीने निघालेली भव्य शोभयात्रा यामुळे को-हाळे बुद्रुक गाव राममय झाले होते. पांरपारीक पद्धतीने दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जयघोष झाला अन राम जन्मला गं सखी राम जन्मला , सियावर रामचंद्र की जय ,पवनसुत हनुमान की जय ,प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा भक्तीमय वातावरणात व जयघोषाने को-हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर मंदीरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली.
श्रीरांमाच्या मुर्तीचे पुजन प्राध्यापक हेमराज गिरी व श्रीराम जन्मोस्तव समिती को-हाळे बु यांच्या वतीने करण्यात आले व सांयकाळी सहा वाजता सकल हिंदु समाज बांधव व श्रीराम जन्मोस्तव समिती यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदीरापासून ते निरा बारामती राज्य महामार्गने ढोल तांशाच्या गजर, डीजेचा नाद , फटाकड्यांची अतिषबाजी आकर्षक विद्युत रोषनाईसह पालखीमध्ये श्रीरामांची मुर्तीचे भव्य अशी शोभयात्रा काढण्यात आली यावेळी युवा वर्ग, महिला वर्ग व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे हिंदू संस्कृती मधील परिवर्तन व्याख्याते हेमराज गिरी हे रामभक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाले की हिंदु धर्मातील सर्वच महापुरूषांनी राष्ट्रहितासाठी आदर्श काम केले आहे त्यांचे आचरण आजच्या तरूण पिढीने करावे अणि जात,प्रांत,भाषेच्या आधारावरील भेदभाव करणाऱ्या सीमारेषा पुसून राष्ट्रहितासाठी संगठित व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले तर व्याख्याते कुमारी क्रांती पेठकर हिंदु जागरण मधील रणरागीनी शाखेतर्फे मत मांडत असतांना हिंदु धर्म म्हणजे राष्ट्रभक्ती आणि हिंदू धर्म देशभक्ती हि भावना सर्व हिंदुच्या मनामध्ये रूजवली पाहिजे तसेच विषेशता हिंदु धर्मातील महिलांनी हिंदु संस्कृतीचे पालन करणे आवश्यक आहे . तसेच लहान वयातच मुलांना योग्य संस्कार देण्यात यावेत.तरच आदर्श पिढी निर्माण होईल.असे मत त्यांनी व्यक्त केले.
येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांच्या वतीने बदोंबस्त राखण्यात आला होता.
No comments:
Post a Comment