बारामती :- बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. 23 ) पार पडली. या सभेमध्ये दिनांक 23/06/2026 बारामती नगर परिषदेच्या जनरल मीटिंगमध्ये प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका व सभापती, महिला व बालकल्याण सविता ताई जाधव तसेच नगरसेवक व सभागृहाचे गटनेते संजय शेठ संघवी यांनी प्रभाग क्रमांक 11 चे खालील प्रलंबित विषय मंजूर करून घेतले. लवकरच प्राधान्य क्रमाने सर्व कामे पूर्ण होतील
असे सांगण्यात आले,तसेच मंजूर विषय पुढीलप्रमाणे:-
1. वसंतनगर येथील दोन मुख्य रस्ते व सर्व अंतर्गत बोळी/रस्ते अनुक्रमे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणे.
2. विजयनगर येथील सिल्वर अपार्टमेंट कडे जाणारा व ऍड प्रभुणे ते वैद्य यांच्या समोरील रोड डांबरीकरण करणे.
3. वसंतनगर येथील जुने शौचालय पाडून दोन मजली शौचालय बांधणे.
4. कृष्णगंगा अपार्टमेंट शेजारून सावंत वस्ती कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.
5. वसंतनगर येथील बालवाडी शाळेची डागडुजी/दुरुस्ती करणे.
6. विवेकानंद नगर येथील बागेचे नूतनीकरण करणे.
7. प्रभाग 11 मधील वेगवेगळ्या ठिकाणी बेंचेस टाकणे.
8. प्रभाग 11 मधील विविध भागात light pole बसवणे.
9. गौतमनगर/विवेकानंद नगर च्या मध्ये असणारी बाग विकसित करणे.
10. प्रभाग 11 मधील विविध ठिकाणी साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे.
11. वसंतनगर व विवेकानंद नगर येथे नवीन चेंबर बांधणे.
12. वसंतनगर येथील शाळा नंबर 8 येथे लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे
13. विजयनगर येथे नावाचा बोर्ड बसवणे
14. शिवकृपा हौसिंग सोसायटी येथील मोकळ्या जागेत उद्यान निर्मिती करणे.
15. मिशन कंपाउंड येथे ड्रीनेज लाईन टाकणे
16. विजयनगर येथील अंतर्गत रस्ता, MES highschool ते चिराग अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे.
17. विजयनगर येथील चिराग गार्डन ते अशोकनगर रस्ता नव्याने करणे व स्ट्रीट light बसवणे.
18. सुतारवस्ती येथील बोळात ड्रीनेज लाईन टाकणे व काँक्रीटीकरण करणे, स्ट्रीट light बसवणे
19. हंगे कॉर्नर ते बागवान यांच्या घरापर्यंत नवीन ड्रेनेज लाईन टाकणे
20. शलाका,सोनिया व सुप्रिया अपार्टमेंट पासून माणिक एलाईट पर्यंत नवीन ड्रेनेज लाईन टाकणे
21. अशोकनगर येथील अंतर्गत रस्ते patch वर्क करणे.
22. वसंतनगर येथे काही ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसवणे
23. शांग्रीला अपार्टमेंट येथे पावसाचे पाणी साठते तेथे उपाययोजना करणे
24. सावंत वस्ती येथे दोन लाईट पोल बसवणे.
25. गौतमनगर साठी शौचालय बांधणे.
26. विजयनगर येथील गांधींच्या शेजारील बाग विकसित करणे.
27. अशोकनगर येथील रमणिक ओसवाल यांच्या शेजारील ओपन space मध्ये नाविन्यपूर्ण बाग विकसित करणे.
28. अकल्पित सोसायटी समोरील बागेत community हॉल विकसित करणे.
29. साईगणेश नगर येथील गार्डन विकसित करणे
30. गौतमनगर शेजारील विवेकानंद नगर कडे जाणारा रस्ता विकसित करणे.
31. गौतमनगर साठी नवीन बौद्ध विहार बांधणे.
32. गौतमनगर येथील चौकास नाव देणे.
33. अशोकनगर येथील विवेकानंद हॉल शेजारील उद्यान विकसित करणे.
34. व्हील कॉलनी येथील करुणा अपार्टमेंट ते पेंटींकॉस्टल चर्च पुढील रस्ता करणे असे काही विषय मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे प्रभाग क्र 11 चे नगरसेविका सौ.सविता जाधव व नगरसेवक संजय संघवी यांनी दिली.
No comments:
Post a Comment