बारामती :- नुकताच दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात शोक कळा पसरली आहे, याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे
शेतातील विहिरीचा कडेला असलेला भाग अचानक कोसळल्याने दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय 55 ) आणि अमोल धनाजी रसाळ (वय 30) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देऊळगाव रसाळ येथील एका शेतातील विहिरीत गाळ काढण्याचे काम सुरु असताना मच्छिंद्र रसाळ आणि अमोल रसाळ हे दोघेही विहिरीत उतरून काम करत होते. काम सुरु
असतानाच अचानक विहिरीच्या कडेचा भाग
कोसळला. त्यामुळे दोघेही मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथे पाठविण्यात आले.
No comments:
Post a Comment