वेल्हे :- वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत ता १३/१०/२०२६ रोजी साय ६३० वाजण्याचे सुमारास वेल्हे नसरापुर रोडवर कातुर्डेवाडी जवळ, ता. राजगड जि.पुणे येथे श्री. विजय मारूती वसवे वय ४७ वर्षे, रा मौजे मालवली, ता राजगड जि पुणे यास आरोपी नामे ओंकार बाळु जाधव ग मालवली, ता राजगड, जि. पुणे
याने जुन्या भांडणाच्या वादातुन जखमी फिर्यादी विजय वसवे यांना पाठीमागुन येवुन गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पळुन गेला होता सदर घटनेमध्ये श्री विजय मारूती वसवे हे गंभीर जखमी झालेले असुन त्याना ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे आणुन प्राथमिक उपचार करून ससून हॉस्पीटल पुणे येथे
नेण्यात आलेले होते. त्याचेवर दि १४/१०/२०२६ रोजी शस्त्रक्रिया करून त्यांचे पाठीमध्ये लागलेली
गोळी काढण्यात आलेली आहे सदर बाबत वेल्हे पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ८१ / २०२६ बी.एन.एस.१०९ (१), शस्त्र अधिनियम ३ (२५), महा. पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हा करून आरोपी हा फरार होता सदर गुन्हा दाखल झालेनंतर गुन्हयातील आरोपी ओंकार
बाळु जाधव रा. मालवली, ता राजगड, जि.पुणे याचा शोध घेणे करीता मा श्री सदीपसिंह गिल्ल
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा श्री शुभम कुमार अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा श्री किरण कुमार सुर्यवशी उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यानी दिलेल्या सुचनेप्रमाणे वेगवेगळी तपास पथके तयार करून सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत बातमी माहीती प्राप्त करून सदर गुन्हयाचे अनुषंगाने आरोपी नामे ओंकार बाळु जाधव रा मालवली, ता. राजगड जि.पुणे यास अवघ्या ८ तासामध्ये दिनांक १४/१०/२०२६ रोजी ताव्यात आलेले असुन पुढील काययेशीर
कारवाई सुरू आहे सदरची कामगिरी मा श्री सदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा श्री शुभम कुमार अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा. श्री किरण कुमार सूर्यवशी उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री किशोर शेवते, पोलीस उप निरीक्षक श्री अमित देशमुख, पो हवा ज्ञानदिप धिवार, पो हवा सोमेश राउत, पो. हवा अजय शिंदे, पो.कॉ आकाश पाटील, पो कॉ राजेंद्र आवटे, पो कॉ शुभम कदम, पो कॉ अजय गार्डी याचे पथकाने पार पाडलेली आहे.
No comments:
Post a Comment