घरफोडी चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक; चोरी केलेले ४ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख रु किं.चा मुद्देमाल हस्तगत..
बारामती:- स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पो स्टे पुणे ग्रामीणची कारवाई
तालुका - पोलीस स्टेशन गु.र.नं. ४१८ / २०२६ बीएनएस ३०५ (ब), ३३१(३) प्रमाणे दखाल
झालेल्या गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल सो, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची बैठक घेवुन बारामती परिसरातील मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सूचना दिल्या. त्या अनुषंगाने तपास सुरू करुन तपास पथकाने मालमत्तेच्या गुन्हयाबाबत गुन्हे घडलेले ठिकाण, गुन्हयाची वेळ,गुन्हयाची कार्यपद्धती याचा माहिती घेवुन तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि,महिला नामे जयपाल लखन पवार वय ४१ वर्षे रा. निरावागज फाटा,निरावागज ता. बारामती जि. पुणे हिने सदरची घरफोडी चोरी केली असून ती बारामती बसस्थानक परिसर येथुन सातारा येथे जाण्याचे तयारीत असले बाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व बारामती तालुका पो स्टे कडील महिला पोलीस यांनी सदर
ठिकाणी जाऊन तिचा शोध घेऊन आरोपी नामे जयपाल लखन पवार वय ४१ वर्षे रा.
निरावागज फाटा, निरावाघज ता. बारामती जि. पुणे हिस बारातील एस.टी बसस्थानक येथुन ताब्यात घेवुन तिचेकडे चौकशी केली असता तिने सदचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी कडुन सुमारे ०४ तोळे सोन्याचे
दागिने असा एकुण ६,००,००० /- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करणेत आले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस
अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम, बारामती उपविभाग,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक नारायण पवार बारामती तालुका पोलीस स्टेशन, स्था. गु. शा. चे पोसई सुधीर वाळुंज, पोसई बाळासाहेब कारंडे,
बारामती तालुका पो स्टे चे ग्रेड पोसई भोसले, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, सचिन होळकर, स्वप्नील अहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण,गणेश डेर, रहिस मुलानी बारामती तालुका पो स्टे चे मपोहवा देवकाते यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ग्रेड पोसई भोसले हे करत आहे.
No comments:
Post a Comment