मौजे बऱ्हाणपूर येथे दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान तूर व कांदा पिकांची पाहणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2026

मौजे बऱ्हाणपूर येथे दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान तूर व कांदा पिकांची पाहणी

मौजे बऱ्हाणपूर येथे दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान तूर व कांदा पिकांची पाहणी
बऱ्हाणपूर :-दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजे बऱ्हाणपूर येथे मा. अपर जिल्हाधिकारी, पुणे श्री. राऊत साहेब यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान गावातील तूर व कांदा पिकांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीचा शेती पिकांवर होणारा परिणाम व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेण्यात आली.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी मा. प्रांताधिकारी श्री. दिघे साहेब, मा. तहसीलदार श्री. स्वप्निल रावडे साहेब, मा. तालुका कृषी अधिकारी श्री. हाके साहेब, मंडळ अधिकारी उंडवडी क.प. श्री. चेतन पोळ साहेब, मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे श्री. वाघमारे साहेब, उपकृषी अधिकारी श्री. काझडे साहेब, ग्राम महसूल अधिकारी बऱ्हाणपूर श्रीमती अश्विनी मारणे, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती गावडे मॅडम, महसूल सेवक तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

या दौऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतीची सद्यस्थिती जाणून घेण्यावर भर देण्यात आला.

No comments:

Post a Comment