बारामती :- दिनांक.21/11/2026 रोजी सायंकाळी 1618 वा चे दरम्यान बारामती तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीत महादेव मंदिराजवळ " अन्याय व्हिला " सूर्यनगरी बारामती येथे इसम नामे राजन धनंजय कोळेकर यांना बी के ग्रुप या instagram वरून कॉल आला व मी BK बोलतोय तुम्ही सगळ्यांना पैसे देता मला दोन पेटी ( दोन लाख) दया असे म्हणाले असता मी कोणाला पैसे दिले नाहीत मी पैसे देणार नाही असे म्हणाले असता तो समोरून बोलला ठिक आहे ठेव फोन व फोन कट केला त्यानंतर सायंकाळी 1800 वाजता फिर्यादी राहत असलेल्या घराचे बाहेर मोटार सायकल रेस केल्याचा आवाज आला त्यानंतर कोळेकर यांनी नक्की रेस करणारे कोण आहेत हे चेक करण्यासाठी घरातील कँमेरे चेक केले तेव्हा एका मोटार सायकल वरून तीन इसम आले असुन त्यातील एकाने फिर्यादी राहत असलेले घराचे खाली त्यांचे उभे असणाऱ्या फोर व्हिलर गाडीवर फायरिंग करून निघुन गेले असल्याचे दिसले
त्यानंतर कोळेकर यांनी पोलीसांना फोन केला. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी येऊन पाहणी केली असता सदर CCTV फुटेज मध्ये तीन इसम एका मोटार सायकल वरून आल्याचे दिसत असून त्यातील एका इसमाने पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या फोर व्हीलर गाडीवर फायरिंग करून निघुन गेल्याचे दिसत आहेत. फायरिंग झाले त्या ठिकाणी गाडी मध्ये अगर पार्कींगमध्ये कोळेकर यांचे कुटुंबातील कोणीही इसम नव्हते. गाडीचे पाठीमागे पाहणी केली असता मागील भागाच्या पत्र्यावर फायरींगचा मार्क दिसत असुन गोळीचा पुढील भाग खाली पडलेला दिसत असुन रोडवर एक खाली केस पडल्याचे दिसत आहे. आम्ही अधीक माहिती.घेऊन फुटेज मध्ये असेलेल्या मोटार सायकल वरील तीन इसमा इसमांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दोन टिम व एक स्थानिक गुन्हे शाखा यांची एक टिम रवाना केलेल्या आहेत. कोळेकर यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करीत आहेत. तसेच FSL टिम बोलावून घटनास्थळ पंचनामा करीत आहेत. घटनास्थळी
पोलिस निरीक्षक नारायण पवार,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांनी भेट दिलेली आहे..
No comments:
Post a Comment