पोलीस स्टेशनचा PSI ACB च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली होती लाच..!
लोणावळा :- लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकाला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.याबाबत माहितीनुसार घटनेचा तपशील पुढील प्रमाणे तक्रारदार: वय 33 वर्षे.यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपी नाथा रामकिशन केकाण वय 38 हा असून, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल होता.या प्रकरणात गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी आरोपीने यापूर्वी 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.याबाबत माहिती अशी की,दि.14 नोव्हेंबर रोजी चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली.तडजोडीनंतर 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
ACB ची सापळा कारवाई
* दिनांक: 16 नोव्हेंबर 2026
* वेळ: रात्री 7.15 वाजता लाच स्वीकारताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
* ठिकाण: लोणावळा परिसरातील तक्रारदाराच्या कामाच्या ठिकाणी – पंचायत समिती फूड कोर्ट, मेत्रो गार्डन शेजारी असून
पुढील कारवाईत
आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अन्वये लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद आहे.
* सापळा अधिकारी – पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे.
* पर्यवेक्षण – पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके.
* पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक.
No comments:
Post a Comment