बंगाली अल्पवयीन मुलीने केली लॉजवर कामाला लावण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध तक्रार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 13, 2026

बंगाली अल्पवयीन मुलीने केली लॉजवर कामाला लावण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध तक्रार..

बंगाली अल्पवयीन मुलीने केली लॉजवर कामाला लावण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध तक्रार..
बारामती :-दिनांक 09/11/2026
फिर्याद देणारी पिडीत वय 17 वर्षे 22 दिवस, व्यवसाय मजुरी मुळ रा.पश्चिम बंगाल  सध्या  शिक्रापूर हिने बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये हजर राहून फिर्याद दिली,की माझे आईवडील मी लहान असतानाच मयत झाले असल्याने मी त्यांना कधीही पाहिलेले नाही. मी माझे जन्मापासुन माझे आजी सोबत राहत आहे. माझी आजी वयोवृध्द झाल्याने मी मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरीचे काम करत आहे. सद्या मी शिक्रापूर पुणे येथे राहण्यास असुन मिळेल त्याठिकाणी मजुरीचे काम करत आहे.
दिनांक 07/11/2026 रोजी मी बारामती येथे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी माझी एका इसमा सोबत भेट झाली. मी त्यास मला काम भेटेल का असे विचारले. त्यावेळी त्याने मला तु हॉटेलवर काम करण्यास तयार आहेस का. तेव्हा मी त्यास होकार दिला. मी त्यास माझे नाव पत्ता सांगितले. त्याने माझ्याकडे आधारकार्डची
मागणी केली असता मी त्यास माझे आधारकार्ड दाखविले. त्याने माझे आधारकार्ड पाहिले. माझे वय 18 वर्ष पुर्ण नसल्यामुळे तो मला म्हणाला की, तुझे अजून 18 वर्ष वय पूर्ण नाही. त्यामुळे मी तुला कामावर घेऊ शकत नाही,त्यावेळी मी त्यास म्हणाले की, मला कोणाचाही आधार नाही मला आईवडील नाहीत, मला कामाची खूप गरत आहे.
तुम्ही मला कामावर ठेवा अशी विनंती केली. त्यावेळी त्याने मला त्याचे नाव छोटु आण्णा असे सांगुन त्याचा मोबाईल नंबर  दिला. त्यानंतर मी त्याचे सोबत बारामती मधील बारामती भिगवण रोड लगत असलेल्या निसर्ग लॉजींग याठिकाणी गेले. मी तेथे साफ सफाईचे काम करीत होते.
दिनांक 09/11/2026 रोजी रात्री 01.30 वाचे सुमारास मी निसर्ग लॉजींग मध्ये असताना छोटु आण्णा हा माझे जवळ आला तो माझे सोबत गप्पा मारू लागला. आम्ही गप्पा मारत असताना तो माझा हात पकडून मला तो त्याचे जवळ ओढून माझे शरीरावर हात फिरवून माझे मनास लज्जा ऊत्पन्न होईल असे कृत्य करू लागला. माझे मलाच लज्जा ऊत्पन्न झाल्याने मी त्यास बाजूला झटकले असता त्याने रागामध्ये मला हाताने दोन तीन कानाखाली मारल्या. तसेच माझे डोक्याचे केस ओढू लागला. त्यावेळी त्याचे सोबत काम करणारे अनोळखी दोन मुलांनी देखील
मला हाताने मारहाण केली आहे. त्यामुळे मी डायल 112 वर कॉल करून पोलीस मदत मागवून घेतली. मी पोलीसांना फोन केल्यामुळे छोटु आण्णा व त्याचे दोन मित्र तेथून पळून गेले. त्यानंतर पोलीस आले. पोलीसांना मी
घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले आहे.
तरी दिनांक 09/11/2026 रोजी रात्रो 01.30 वाचे सुमारास मौजे सावळ गावचे हद्दीत बारामती भिगवण रोड लगत निसर्ग लॉजींग मध्ये इसम नामे छोटु आण्णा पुर्ण नाव पत्ता माहिती नाही यास मी अल्पवयीन आहे हे माहिती असताना माझे सोबत गप्पा मारून माझा हा पकडून मला जवळ ओढून माझे शरीरावर हात फिरवून माझे मनास लज्जा ऊत्पन्न होईल असे कृत्य करून मला हाताने दोन तीन कानाखाली मारून माझे डोक्याचे केस ओढू मला मारहाण केली. तसेच त्याचे सोबत काम करणारे अनोळखी दोन मुलांनी देखील मला हाताने मारहाण केली आहे. म्हणून माझी इसम नामे छोटु आण्णा पुर्ण नाव पत्ता
माहिती नाही व त्याचे दोन अनोळखी मित्र यांचे विरूध्द कायदेशिर तक्रार करीत आहे.यावरून पोलीस अधिक तपास करीत असून एकजण अटक असल्याचे कळतंय तर यामध्ये आणखी कोणकोण आहे, कुणाकुणाचा सहभाग असून अश्या ठिकाणी नक्की कोणते व्यवसाय चालतात का बंगाली अल्पवयीन मुली याठिकाणी आहेत याचा सखोल तपास होणार का याचीच जास्त चर्चा होत आहे.

No comments:

Post a Comment